top of page
Writer's pictureGirija Wagh

गरोदरपणी स्वास्थ्य



चाहूल लागली आता पुढे काय? तीन सूत्री प्रयोजन, यशाची गुरुकिल्ली म्हणजेच आहार, विहार आणि विचार।


गरोदरपण हे स्त्रीत्वाच्या सुंदर अश्या वेलीला आलेले एक मोहक पुष्प म्हणायला हरकत नाही की ज्याचे प्रसूति नंतर नवजात अर्भकाच्या रुपात फलस्वरूप होवून आप्तेष्टांना एक उत्कट अनुभव देऊन जाते। पहिली चाहूल ही मासिक चुकल्याने लागते तर गर्भचाच्णी चिकित्सा सकारात्मक (pregnancy test positive) येणे म्हणजे या वेलाला पालवी फुटली आहे असे म्हणायला हरकत नाही। हीच ती फलद्रूप कळी आहे याचे निदान सोनोग्राफी द्वारे पहिल्या ठोक्यांची चाहूल लागली की होते आणि त्या जोडप्याला निस्सीम आनंद देवून जाते।


स्त्रीआरोग्य चिकिस्त्सकाकडउन आवश्यक त्या चाचण्या आणि मातेची तब्यतिचा आढावा घेता येतो। नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सूर्वक्षणात लठ्ठपणा, थायरॉईड दुरव्यावस्था, मधुमेह,रक्तदाब, रक्तक्षय (anemia) आणि मानसिक अस्वास्थ्य अश्या व्याधीचे प्रमाण गरोदर पणात वाढलेले आहे। ह्याच कारणासाठी वेळोवेळी तपासणी करून मातेला या व्याधी आहेत किवा होण्याची शक्यता आहे का याचे अनुमान करणे गरजेचे आहे। ह्या सर्वांबरोबर गर्भातले व्यंग (उदा anencaphaly, birth defects), गर्भाची निष्कृष्ट वाढ (Fetal Growth Restriction FGR), मुदतपूर्व प्रसुति (Preterm delivery) अश्या प्रतिकूल परिणामांचे प्रमाण देखिल वाढलेले दिसते। या सर्व समस्यांचे निदान नियोजन बद्ध अश्या antenatal care द्वारे केले जाते। प्रसुतीपूर्व जपणूक या संकलपणेला एक अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे कारण लसीकरण, वरती नमूद केलेल्या परिस्थिीबद्दल चाचणी आणि त्याचे निर्मूलन करून सुरक्षित प्रसुतीचे नियोजन करता येते। शिवाय आईच्या जीवनशैलीत सुधारणा करून बऱ्याच व्याधींवर नियंत्रण साधता येऊ शकते। या सर्व बाबी चिकित्सक अनुमान लाऊन सल्ला हे देतील। परंतु मुख्य योगदान इथे त्या गर्भवती महिलेचे असायला लागते।


गरोदरपणी स्वास्थ्य जोपासण्याचे तीन उत्तम पैलू मी नमूद करू इच्छिते की जे माझ्या तीस वर्षांच्या प्रघात मध्ये ज्या स्त्रियांनी अंगीकारले त्यांना उत्तम सकारात्मक प्रचिती आली। हे तीन सूत्र म्हणजे:


१.आहार

२. विहार

३. विचार


चला तर बघू यात काय आहे हा तीन सूत्री मागोवा।


१.आहार: मातेचा आहार बाळाच्या गर्भावस्थेतील संगोपनाची एक मूलभूत पाया आहे। आईचा आहार हा सात्विक असावा की जेणे करून तिला गरोदरपणात वाढलेल्या गरजांचे समाधान करण्यासाठी ऊर्जा आणि सत्व मिळावेत। शिवाय तो आहार जाचक नसावा। पचण्यास हलका, उत्तम प्रतीच्या करबोदकांचे समावेश असावा , उदा: संपूर्ण आणि कोंड्यासहित गव्हाचे, ज्वारीचे, बाजरीचे पीठ, भगर, नाचणी कारण याच्यात B जीवनसत्व आणि फायबर पुरेपूर असते शिवाय भरपूर ऊर्जा। भाज्या, मोड आलेले कडधान्य, फळे, मूळ, कंदमुळं, काजू, अक्रोड, बदाम, मणुके, बी बियाणे याचे भरपूर सेवन करावे। मुबलक प्रमाणात पाणी, ताक, दही, पेज, सूप्स, भाज्या आणि फळणचा वापर करून smoothies, milkshakes चा सामाविष्ट असावा। सहा ते सात तासांच्या वर रिकाम्यापोटी राहू नये। घरी बनवलेले स्वच्छ पूरक खाद्य पदार्थ सर्वोत्तम। अतिप्रमाणात मसाले, साखर, मीठ याचे सेवन टाळावे। जंकफूड (वडापाव, पिझ्झा, burger, cream rolls, मोमो, पावभाजी) टाळावे। त्याचबरोबर अस्वच्छ, शिळे,उघड्यावरील पदार्थ घेऊ नयेत। टायफॉइड, कावीळ ह्या व्याधी गरोदर मातेचा जीव धोक्यात घालू शकतात। चहा, कॉफी चे प्रमाण बेताचे असावे। पूरक आणि संपूर्ण आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे।


सध्याच्या विश्र्वस्तरिय आरोग्य धोरणांमध्ये First1000 days नावाचा संकल्प रुजू झाला आहे। असे निदर्शनास आले आहे की दिवस रहण्यागोदर्चे 3 महिने, गरोदर पणातील ९ महिने आणि जन्मनंतरचे 2 वर्षे ज्या मधील १२,महिने स्तनपान अश्या 1000 दिवसांमध्ये जर मातेचा आहार परिपूर्ण साधला तर Non communicable Diseases (NCDs), अर्थात असंसर्गजण्या आजार उदा। मधुमेह,लठ्ठपणा, रक्तदाब,कर्करोग अश्या आजारांपासून आपण भावी पिढीचे संरक्षण करू शकू।


2.विहार: याचा शाब्दिक अर्थ म्हणजे शारीरिक व्यव्हार उदा: शयन, मनोरंजन,व्यायाम, गतीहिन जीवनशैली। सरळ अर्थ म्हणजे आनंदाची देवाण घेवाण हे होवू शकतो। बोधिसत्वात मठांना विहार असे म्हणतात की ज्या ठिकाणी चैतन्य जोपासले जाते। गर्भावस्थेत देखील विहार उत्तम असावा। प्रसन्न चित्तवृत्ती, आनंदी स्थायीभाव अंगिकारून आत्मविश्वास जोपासणे गरजेचे आहे। शारीरिक स्वच्छतेचा प्रतीपाल असावा। मुखस्वछता जसे की जीभ, दात स्वच्छ ठेवणे गरजेचे असते। सूती स्वच्छ कपडे घालावेत, अतीतलम, सिंथेटिक कपडे टाळावेत। पूरक झोप, लवकर झोपून लवकर उठणे जनेकरून रात्रीची किमान ६ ते ७ तास उत्तम निद्रा आणि दुपारी ३०ते ४० मिनिटांची वामकुक्षी किवा विश्रांती घ्यावी। अनाठायी जागरण, प्रदीर्घ screentime टाळावा। व्यायाम, प्राणायाम, योगासने करावीत। सतत बसणं किवा उशीरपर्यंत झोपणं टाळावे.रोज किमान ७००० ते १०००० पावले चालणे, स्नायूंवर ताण पडेल असे व्यायाम , स्नायूंची बळकटी तसेच लवचिकता वाढेल अशी दिनचर्या असावी।


अश्याने गर्भावृधी होते, शारीरिक क्षमता वाढते शिवाय प्रसूति नैसर्गिक होण्यास मदत होते। अतिप्रमाणात लठ्ठपणा आणि मदुमेहासारख्या व्याधी टाळता येऊ शकतात। अमली पदार्थांचे सेवन, धूम्रपान, मध्य,मनानेच औषदोपोपचार टाळावेत।


३. विचार: समृध्द विचार, सुखकारक आणि समाधानी वृत्त्ती जोपासणे गरजेचे आहे। आपल्या बाळाची आई कशी असावी याचे संस्मरण करून चित्र रेखाटून त्याच्या सारखे वागण्याचा सतत प्रयत्न असावा। सकारात्मक पुष्टीकरण जोपसावे। भितियुक्त विचार, सतत काळजीचे सावट, नकारात्मक दृष्टी, अनाठायी चिंता टाळावी।


सर्व उत्तर औषधांमध्ये नसतात, गरोदरपणात नवनिर्मितीचा निखळ आनंद आणि सुंदर्श्या आहे अनुभूतीचा वरील तीन सुत्त्री अनुष्ठाने नक्कीच एका सुदृढ बालकाची सास्वती बाळगायला हरकत नाही आणि अर्थातच मातेचे देखील स्वास्थ्य सुरक्षित राहील। कारण या नवनिर्मितीच्या क्रिये मधून सशक्त आणि सुदृढ भावी समाज जोपासण्याची आपली सर्वांची मूलभूत जबाबदारी आहे।

Comments


bottom of page