आहार हा नुसताच भूक शमावण्या साठी नसून आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी अतिमहत्वाच्या असा मूलभूत घटक आहे. गरोदर अवस्थेत आहाराचे एक विशेष महत्त्व आहे. याचे कारण की गरोदर पण ही एक गतिशिल स्तिती आहे जिथे ऊर्जेची आवश्यकता अफाट असते. शिवाय आहारात अश्या काही गोष्टींचा समाविष्ट असणे गरजेचे असते कि ज्याने गर्भाचे कुपोषण होता कामा नाही तसेच मातेचे आरोग्य टिकून राहणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात स्तूलपणा, रक्तदाब, थायरॉईड व्याधी आणि हृदयरोग अश्या आजारांचे वाढते प्रमाण हे अहराशी नक्कीच निगडित आहे. नुसताच मातेचाच नव्हे तर गर्भाचे पण संस्करण आईच्या आहारावर अवलंबून असते.
फर्स्ट 1000 days असा एक नवीन उपक्रम सध्या बराच चर्चेत आहे. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा देशभर राष्ट्रीय आहार सप्ताह म्हणून मानला जातो त्या निमित्ताने गरोदर मातेचा आहार, विहार आणि फर्स्ट 1000 days ह्या उपक्रमाबद्दल लिहिण्याची इच्छा झाली. आरोग्य सप्ताहाच्या प्रयोजनच मुळी प्रबोधन आणि माहिती असेच असल्याने हे मला योग्य वाटते.
गरोदर मातेच्या आहाराला पाहिले गालबोट लागते म्हणजे सुरुवातीच्या काळात अनुभवावा येणारी मळमळ आणि वांती. खरतर हा काळ पूरक, समतोल आणि पोषक असणे फार गरजेचे असते. कारण या काळात गर्भाच्या प्रारंभिक अवस्थेत शरीरातील सर्व संस्थांची स्थापना होत असते त्याच बरोबर वारेचे रोपण हे झपाट्याने होत असते. ह्या अंतर्गत घटना घडत असताना आईच्या शरीरामध्ये HCG, progesterone तसेच estrogen नामक संप्रेरकांची पातळी वाढते. ह्या होणाऱ्या अंतर्गत बदलांना अंगवळणी पाडणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा सर्वप्रथम भीती आणि काळजी यानेच महिला ग्रासलेल्या दिसतात.
शिवाय नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आहार आणि विश्रांती ह्या दोन्हींचा अभाव दिसतो ज्याची करणे अनेक असू शकतात पण थोडेसे स्वतःकडे लक्ष केंद्रित केल्यावर ह्या लक्षणांवर मात मिळवता येते. सरासरी ६० ते ७० टक्के स्त्रियांना मळमळ अनुभवास येते तर १-२ टक्के अतिप्रमाणात वांत्याना सामोरे जातात आणि हतबल होताना दिसतात.
नुसत्याच मळमळ असणाऱ्या स्थितीला NVP म्हणजे nausea vomiting of pregnancy असे म्हणतात तर अतीप्रमाणात होणाऱ्या वांत्यानच्या स्तितीला HG. म्हणजे Hyperemesis Gravidarum असे म्हटले जाते. काहीजणी वास नीट येत नाही किवा वास येतो म्हणून खावेसे वाटत नाही असे सांगतात.
किती प्रमाणात त्रास आहे ह्याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले जाते आणि त्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जातात. काही इतरत्र कारणे पण असू शकतात उदा: अगोदरची पित्त प्रवृत्ती, निकस (junk) आहाराचे सेवन, अति प्रमाणात उपस्माराचा कालावधी, मसालेदार आहार.
काही रक्त तपासण्या करणे गरजेचे असते ज्याने स्त्रीची आरोग्य स्तीती पडतळता येते.गरज भासल्यास शिरेतून इंजेक्शन किवा दवाखण्यात भरती करावी लागू शकते. काही सुरक्षित आशी औषधे सुधा उपयुक्त ठरतात पण ही योग्य मार्गदर्शनाने घेतलेली बरी.
खालील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतील
1. सर्वप्रथम मनातील भीती आणि काळजीकाढून टाका आणि आत्मविश्वासाने गरोदरपण स्वीकारा.
2. समतोल आहार साधने गरजेचे आहे : भरपूर प्रमाणात भाज्या ,फळभाज्या, नट्स, दाणे, कसदार आहार घ्या.
3. किमान 3 वेळा पूरक आहार घ्या .सर्व प्रकारचे भारतीय आहार पद्धती ही पूरक मानली जाते
4.मधल्या काळातील नाश्ता हा पौष्टिक असावा.उदा: चिक्की , लाडू , वड्या, सालाड्स, दही, ढोकळा ,सूप ,फळे ई.
5. दुधाचे सेवन करा , पचत नसल्यास दुघजण्य पदार्थ घ्या
6. उपवास टाळा
7.चहा ,कॉफी याचे अतिसेवन नको
काही घरगुती उपाय आपण बघू या : आले आणि मध, आलेपाक, मधपाणी, कोकम, आवळा, कोरडे पदार्थ, वारंवार थोडा काहीतरी पौष्टिक घेतल्याने NVP आपण नियंत्रित करू शकतो.
फर्स्ट 1000 डेझ..असे निदर्शनास आले आहे की गर्भावस्थेतील आईच्या उदरातील कालावधी (२७० दिवस), स्तनपान संस्कारित कालावधी (३६५ दिवस) आणि आयुष्याचे दुसरे वर्ष (३६५ दिवस) म्हणजेच गर्भधारणा पासून ते दोन वर्षांचा असा 1000 days चा आयुष्याच्या सुरुवातीचा कालावधी हा भावी आयुष्यातील आरोग्य स्थितीचा पाया आहे आणि त्याच मुळे मातेचा आहार जपणे हे अतिमहत्वाच्या आहे. ह्या काळात आहार, सुरक्षा, व्यायाम, प्रेम,वातावरण ह्या पाच मूलभूत तत्वांचा योग्य उपाययोजना केल्यास पुढील जीवनासाठी निर्णायक असे बदल घडवून आणता येऊ शकतील. Journey of First 1000 days हा जीवनक्रम हा पुढच्या पिढ्यांचा आरोग्य नकाशा आहे. याउपर जर गरोदर पणाला सामोरे जाण्यापूर्वी जर स्त्रीने योग्य आरोग्य बांधणी केली उदा: लसीकरण, वजन नियंत्रण, पूरक तत्वांचे सेवन, शारीरिक स्वास्थ्य, व्याधी असतील तर त्यांचे वैद्यकीय नियंत्रण असे जर साधले तर खरेच सोने पे सुहागा.
सर्वात महत्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असावा ज्याने चित्तवृत्ती समतोल राहतात आणि त्या करता विचारांचा धाचा महत्वाचा आहे. जागरूकपणे आपल्या गरोदर अवस्थेकडे एका सुंदर जबाबदारीच्या दृष्टीने बघा. आपल्या बाळासाठी आपले स्वतःचे आरोग्य वृद्धिंगत करणे आणि बाळाला सातत्याने पोषक तत्वांचा स्तोत उपलब्ध करणे हे मातेचे महत्वाचे कर्तव्य आहे आणि प्रत्येक मातेचे हे निरोगी समाज बांधणी साठीचे योगदान आहे.
Dr. Girija Wagh
Comments